पाणी तुंबल्यास अभियंता जबाबदार; मुंबई महापालिकेचा इशारा

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून नालेसफाईच्या कामाचा नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला
पाणी तुंबल्यास अभियंता जबाबदार; मुंबई महापालिकेचा इशारा

मुंबई : नालेसफाईचे काम ज्या विभागात योग्य पद्धतीने झाले नाही आणि त्या ठिकाणी पाणी तुंबले, तर अभियंता व दुय्यम अभियंता जबाबदार असतील, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून नालेसफाईच्या कामाचा नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. ज्या विभागात नालेसफाई होऊन पाणी तुंबले तर त्या ठिकाणी कार्यरत अभियंता व दुय्यम अभियंता जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांना केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून जो भाग जलमय होईल त्या ठिकाणचे अभियंता व दुय्यम अभियंता जबाबदार असतील, आसा स्पष्ट इशारा दिला आहे.

मुंबईतील मोठ्या नाल्यांची जबाबदारी अभियंता व लहान नाल्यांसाठी दुय्यम अभियंता जबाबदार असतील, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.आधी-नंतरचे फोटो झळकणार
नालेसफाई झाली नाही, असा आरोप केला जातो. त्यामुळे आता नालेसफाई आधी तेथील कचरा, नालेसफाई करताना व नालेसफाईची कामे पूर्ण झाल्यावर असे फोटो पालिकेच्या वेबसाईट टाकण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in