एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क कोरोनानंतर पुन्हा एकदा पक्षीप्रेमींसाठी खुले

एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क कोरोनानंतर पुन्हा एकदा पक्षीप्रेमींसाठी खुले

कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे अनेक पर्यटन स्थळे, उद्याने इतर स्थळांना टाळे ठोकण्यात आले होते. मात्र, आता हळूहळू कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर हीच पर्यटन स्थळे, उद्याने खुली करण्यात येत आहेत. अनेक प्रमुख उद्याने, पर्यटन स्थळानंतर आता ‘एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क’देखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींना कोरोनानंतर पुन्हा एकदा पक्ष्यांचा किलबिलाट आणि रंगबेरंगी पक्षी अनुभवता येणार आहेत.

‘एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क’ हे प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञांनी विकसित केलेले भारतातील पहिले विदेशी पक्षी उद्यान आहे. या उद्यानात देशातीलच नव्हे तर विदेशातील पक्ष्यांना राहता येईल असे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या उद्यानात तब्बल ५०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती असून जगभरातील ५० पक्षी या उद्यानात आहेत. यामध्ये ब्लू गोल्ड मकाउ, आफ्रिकन ग्रे पॅरोट, रेंम्बो लॉरिकिट असे विविध प्रजातीचे पक्षी या उद्यानात आहेत.

या पार्कमध्ये पक्षीप्रेमींना हे पक्षी केवळ बघायलाच मिळणार नाहीत तर पक्ष्यांसोबत फोटो काढता येणार आहेत. त्यांना आपल्या हाताने त्यांचे जेवण भरवता येणार आहे. दरम्यान, बऱ्याच प्रतीक्षेनंतर मुंबईतील हे सर्वात मोठे पक्षी उद्यान पुन्हा सुरू झाल्याने या उद्यानात पक्षांसोबत सुंदरशा हिरवळीचादेखील अनुभव पक्षीप्रेमींना घेता येणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in