ऑस्ट्रेलियातही गणेशोत्सव धूमधडक्यात साजरा; अॅडलेड येथे बाप्पाचे आगमन

संपूर्ण ऑस्ट्रेलियामधून जवळ जवळ १५ ते २० हजार नागरिकांनी राजाचे आगमन करत उत्सवाला सुरुवात केली आहे
ऑस्ट्रेलियातही गणेशोत्सव धूमधडक्यात साजरा; अॅडलेड येथे बाप्पाचे आगमन

सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असताना साता समुद्रापार असणाऱ्या ऑस्ट्रेलियातही शनिवार, ३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झाली आहे. युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया ह्या अॅडलेड स्थित शहारामध्ये ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ ह्या नावाने प्रचलित गणेशोत्सव साजरा होत आहे. ३ व ४ सप्टेंबर रोजी अनेक कलात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत आहेत. संपूर्ण ऑस्ट्रेलियामधून जवळ जवळ १५ ते २० हजार नागरिकांनी राजाचे आगमन करत उत्सवाला सुरुवात केली आहे.

१६ जुलै रोजी निघालेला हा बाप्पा जहाजाने तब्बल दोन महिने प्रवास करत ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड शहरात पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियात सदर उत्सव हा २०१६ पासून साजरा होत असून ह्या वर्षी लालबाग, मुंबई येथे बनवलेली २१ फूट उंच गणेशमूर्ती ४५ दिवसांचा बोटीचा प्रवास करून अॅडलेड येथे पोहोचली. संपूर्ण ऑस्ट्रेलियातून जवळपास १५ ते २० हजार नागरिक या बाप्पाचे दर्शन घेतात, असे भारतीय प्रतिनिधी ठाणेस्थित राजेंद्र झेंडे ह्यांनी सांगितले. यंदा हे या संघटनेचे सहावे वर्ष आहे. ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ म्हणून ख्याती असणाऱ्या या परदेशी बाप्पाची अखिल भारतीय सार्वजनिक गणेश उत्सव समितीमध्येदेखील नोंद असून अशाप्रकारे परदेशातील गणराय नोंद असलेला हा बहुधा एकमेव परदेशी गणपती असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in