रक्ताचं नातं नसलं तरी अवयवदान महत्वाचं किडनी व लिव्हरदानाने ५६ जणांना जीवदान

प्रत्यार्पण समितीची माहिती
रक्ताचं नातं नसलं तरी अवयवदान महत्वाचं किडनी व लिव्हरदानाने ५६ जणांना जीवदान

मुंबई: अवयव दान सर्वश्रेष्ठ दान असले, तरी अनेक वेळा रक्ताचं नातं नसलेली व्यक्ती एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करते. मुंबईत गेल्या वर्षभरात ५६ रुग्णांना किडनी व लिव्हर दान करत जीवनदान देण्यात आल्याची माहिती अवयव प्रत्यार्पण मुंबई जिल्हा समितीचे अध्यक्ष डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

अवयवदान सर्वश्रेष्ठ दान आहेच. अवयवदानात आईने मुलाला अवयवदान केले, पत्नीने - पतीला, वडीलाने - मुलाला अवयवदान केले, हे नेहमीच ऐकत असतोच. परंतु नात्यांत असलं, तरी रक्ताचं नातं नाही, मित्र मित्राला अवयवदान करत जीवदान दिले, असे प्रकार कमीच उजेडात येत असतात. परंतु रक्ताचं नातं नसतानाही किडनी, लिव्हर दान करत एखाद्याला जीवनदान दिल्याचे समोर आले आहे. मुंबईत केईएम, जसलोक, सैफी, ग्लोबल, रिलायन्स, बॉम्बे रुग्णालय अशा विविध रुग्णालयात किडनी व लिव्हर दान करत ५६ रुग्णांना जीवदान दिले आहे.

रुग्णालय - किडनी - लिव्हर दान

केईएम - ९ - ४

जसलोक - ७ - ३

ग्लोबल - २० - २०

रिलायन्स - ५ - ७

बॉम्बे - ४

सैफी - ७

...म्हणून समितीची नजर!

राज्यातील अवैध अवयवदान रोखण्यासाठी १९९४ मध्ये कायदा करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली. त्यानुसार अवैध अवयवदानाला सक्षमपणे आळा घालण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करण्यात आली. या समितीअंतर्गत विभागीय समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये चार विभागीय समिती स्थापन करण्यात आले आहेत. या समितीकडे अवयवदान करणारी व्यक्ती आणि अवयव प्राप्त करणारी व्यक्ती यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा कोणताही व्यवहार झाला आहे की नाही हे पडताळण्याची तसेच त्यांचे कागदपत्रे तपासण्याची आणि त्यानंतर अवयवदानाला परवानगी देण्याची जबाबदारी समितीवर असते. या समितीमधील सर्वच सदस्य हे डॉक्टर आहेत.

-डॉ. तुषार पालवे, अध्यक्ष, अवयव प्रत्यार्पण समिती

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in