दरवर्षी भारतीय ८७ लाख टन अन्न फुकट घालवतात; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

कोविडकाळात भारताने कोणीही नागरिक उपाशी राहू नये म्हणून नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप केले होते
दरवर्षी भारतीय ८७ लाख टन अन्न फुकट घालवतात; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

अन्न हे पूर्णब्रह्म’ असे आपली भारतीय संस्कृती मानते; पण भारतीय लोक हे अन्न फुकट घालवण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले. दरवर्षी भारतीय सहा कोटी ८७ लाख १६३ टन अन्न फुकट घालवत असल्याचा खळबळजनक अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत अन्न नासाडी निर्देशांकातून उघड झाला आहे.

कोविडकाळात भारताने कोणीही नागरिक उपाशी राहू नये म्हणून नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप केले होते. गरीब कल्याण योजनेंतर्गत ही योजना राबवली होती; मात्र भारताने अन्नाची नासाडी रोखल्यास देशात कोणीही उपाशी झोपणार नाही.

‘अर्थ ओव्हरशूट दिवसा’च्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी अन्न वाया न घालवण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. यंदा २८ जुलैला हा ‘अर्थ ओव्हरशूट दिवस’ आला आहे. या तारखेचे वैशिष्टय म्हणजे, निसर्गाकडून वर्षभरात मिळणाऱ्या संसाधनाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. वर्षाच्या अन्य दिवशी आपण पृथ्वीवरील संसाधने रिकामी करत असतो. ‘अर्थ ओव्हरशूट’च्या दिवशी नैसर्गिक संसाधनाच्या नुकसानीचे अनुमान लावले जाऊ शकते. निसर्ग वर्षभरात जितके उत्पादन घेण्यास सक्षम आहे. तेवढे उत्पादन आपण वर्ष पूर्ण होण्याच्या आत संपवून टाकतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in