१८ ते ५९ वयोगटातील सर्व व्यक्तींना मिळणार मोफत बूस्टर डोस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे
 १८ ते ५९ वयोगटातील सर्व व्यक्तींना मिळणार मोफत बूस्टर डोस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देशातील १८ ते ५९ वयोगटातील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातही या वयोगटातील सर्वांना बूस्टर डोस देण्याच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपले  दूरध्वनीवरून बोलणे झाले आहे. या देशव्यापी मोहिमेची तातडीने अंमलबजावणी राज्यात करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जनजागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.आणिबाणीत तुरूंगवास भोगलेल्यांना पुन्हा पेन्शनप्रतिनिधी/मुंबईदेशात आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना फडणवीस सरकारने पेन्शन सुरू केले होते. मात्र आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने पूर्वीप्रमाणेच पेन्शन देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.या योजनेंतर्गत १ ऑगस्ट, २०२२ पासून मानधन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा १० हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस ५ हजार रुपये मानधन, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा ५ हजार रुपये  तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस,पतीस २ हजार ५०० रुपये इतके पूर्वीप्रमाणेच मानधन देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in