मीठ, साखरेचा अतिवापर आरोग्याला धोकादायक; BMC राबवणार जनजागृती अभियान

फोटो शौ : FPJ
Published on
जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्तपणे करण्यात आलेल्या स्टेप्स सर्व्हे २०२१ नुसार, मुंबईतील नागरिकांमध्ये ३४% उच्च रक्तदाब आणि १८% मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्तपणे करण्यात आलेल्या स्टेप्स सर्व्हे २०२१ नुसार, मुंबईतील नागरिकांमध्ये ३४% उच्च रक्तदाब आणि १८% मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे. फोटो शौ : FPJ
मीठ व साखर यांच्या अतिवापरामुळे उच्च रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
मीठ व साखर यांच्या अतिवापरामुळे उच्च रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. फोटो सौ : Free Pik
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय व्यक्ती अपेक्षित "५ ग्राम" मिठापेक्षा जास्त मिठाचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय व्यक्ती अपेक्षित "५ ग्राम" मिठापेक्षा जास्त मिठाचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. फोटो सौ : Free Pik
मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मीठाचे सेवन करतात. मुंबईकर नागरिकांनी मिठाच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली
मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मीठाचे सेवन करतात. मुंबईकर नागरिकांनी मिठाच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिलीफोटो सौ : Free Pik
भविष्यातील पिढ्यांमध्ये असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी मीठ आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
भविष्यातील पिढ्यांमध्ये असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी मीठ आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.फोटो सौ : Free Pik
रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. समुदाय स्तरावर व शाळा येथे अतिरिक्त मीठ व साखर याबाबत जनजागृती करून लहान वयातच आरोग्यदायी सवयी रुजवण्याचे महत्त्व सांगितले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. समुदाय स्तरावर व शाळा येथे अतिरिक्त मीठ व साखर याबाबत जनजागृती करून लहान वयातच आरोग्यदायी सवयी रुजवण्याचे महत्त्व सांगितले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. फोटो सौ : Free Pik
विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, लहान वयात मीठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब, मधूमेह व हृदयविकार इत्यादी आजार होण्याचा धोका कमी करता येतो.
विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, लहान वयात मीठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब, मधूमेह व हृदयविकार इत्यादी आजार होण्याचा धोका कमी करता येतो.फोटो सौ : Free Pik
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून व मे महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या मीठ जनजागृती अभियानाचा आठवडा च्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच पार्टनरशीप फॉर हेल्दी सिटीज आणि अमेरिकेअर्स इंडिया यांच्या सहकार्याने “मीठ व साखर जनजागृती” अभियान राबविण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून व मे महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या मीठ जनजागृती अभियानाचा आठवडा च्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच पार्टनरशीप फॉर हेल्दी सिटीज आणि अमेरिकेअर्स इंडिया यांच्या सहकार्याने “मीठ व साखर जनजागृती” अभियान राबविण्यात येणार आहे.फोटो सौ : Free Pik
समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्याकरीता मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी यांच्या सहभागाने चित्रफित बनविण्यात आली असून सदर चित्रफितीचे प्रसारण करण्यात येईल. डिजिटल प्लॅटफॉर्म, शालेय व महाविद्यालयीन शेफ, रेस्टॉरंटचे कर्मचारी व महिलांसाठी आहारतज्ञ यांच्यामार्फत संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्याकरीता मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी यांच्या सहभागाने चित्रफित बनविण्यात आली असून सदर चित्रफितीचे प्रसारण करण्यात येईल. डिजिटल प्लॅटफॉर्म, शालेय व महाविद्यालयीन शेफ, रेस्टॉरंटचे कर्मचारी व महिलांसाठी आहारतज्ञ यांच्यामार्फत संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. फोटो सौ : FPJ
logo
marathi.freepressjournal.in