मंत्रालयात बॉम्ब असल्याच्या फोन कॉलने खळबळ ; पोलीस यंत्रणा सक्रिय

कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
मंत्रालयात बॉम्ब असल्याच्या फोन कॉलने खळबळ ; पोलीस यंत्रणा सक्रिय

मुंबई पोलिसांना मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा तसंच बॉब्म शोधक पथक सक्रिया झालं असून कर्मचाऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मंत्रालयात बॉम्ब असल्याचा फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव देखील समोर आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व्यकीने हा फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. बाळकृष्ण ढाकणे असं फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगितल जात आहे. या फोन कॉलनंतर मंत्रालयातील सुरक्षेत वाढविण्यात आली आहे. पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवलं जात असून त्यांची तपासणी केली जात आहे.

मंत्रालयात येणाऱ्या जाणाऱ्यांची श्वान पथकाद्वारे तापसणी केली जात आहे. तसंच गाड्यांची देखील सखोल तपासणी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्ब असल्याचा फोन कॉल आल्यानंतर मंत्रालयाच्या संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली. यात कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. पोलिसांनी कुठेही बॉम्ब नसल्याची खात्री केली. यामुळे कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी घाबरुन जावू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

सध्या अशा प्रकारच्या निनावी फोन कॉल्स येण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात हा दुसरा फोन असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासकार्य केलं. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे मंत्रालयात कुठलाही बॉम्ब नसल्याचं निष्पन्न झालं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in