निरक्षरांच्या सर्वेक्षणातून शिक्षक, शिक्षकेतरांना वगळा

शिक्षक भारतीचे शिक्षणमंत्र्यांना पत्र
निरक्षरांच्या सर्वेक्षणातून शिक्षक, शिक्षकेतरांना वगळा

मुंबई : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्र पुरस्कृत ‘नवभारत साक्षरता कार्यक्रम’ २०२२-२७ निरक्षरांचे सर्वेक्षणाचे काम दिले आहे. हा सर्वेक्षण कार्यक्रम हा शालेय प्रशासन व व्यवस्थापन यांना अडचणीत आणणारा आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा असल्याने अनेक शिक्षक, मुख्याध्यापक संघटनानी नवभारत साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. अनेक संघटनानी बहिष्कार टाकण्याचे निवेदन कार्यालयात सादर केले आहे.

स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन सदर सर्वेक्षण केल्यास शाळांचे दैनंदिन कामकाज कोलमडणार नाही. सद्यस्थितीत शाळांमध्ये प्रथम घटक चाचणी तसेच विविध सहशालेय उपक्रमांच्या स्पर्धा सुरू आहेत. सर्वेक्षण शाळा सुरु होण्यापूर्वी अथवा शाळा सुटल्यानंतर करण्याबाबतचे आदेश आहेत. मुंबईतील शाळांमध्ये मुंबईबाहेरील (ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार, कल्याण, डोंबिवली) शिक्षक, शिक्षकेतर मोठ्या संख्येने आहेत. दोन तास प्रवास करून शालेय वेळात सहा तास कामकाज केल्यानंतर सर्वेक्षण करण्याचे काम देणे योग्य नाही. शाळेतील दैनंदिन अध्यापनाचे नियोजन करण्यासाठी, विविध उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांना वेळ देणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वगळण्याची उचित कार्यवाही करावी, असे पत्र शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिल्याचे शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in