सामूहिक चित्र व शिल्पकृतींचे प्रदर्शन

अपरिमिता सप्रू यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात कलाकारांनी तैलरंग, ॲक्रिलिक रंग, मिक्स मिडिया वगैरेमध्ये साकारलेली विविधांगी चित्रे
सामूहिक चित्र व शिल्पकृतींचे प्रदर्शन

मुंबईतील सिमरोझा आर्ट गॅलरीत १६ डिसेंबरपासून सामूहिक चित्र व शिल्प प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. १६ ते १९ डिसेंबर दरम्यान २४ कलाकारांच्या चित्र व शिल्पकृतींचे प्रदर्शन एकाच छताखाली रसिकांना पाहता येणार आहे. अपरिमिता सप्रू यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात कलाकारांनी तैलरंग, ॲक्रिलिक रंग, मिक्स मिडिया वगैरेमध्ये साकारलेली विविधांगी चित्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात मुख्यतः निसर्गचित्रे, शहरी व ग्रामीण जीवनशैली व सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी चित्रे, ऐतिहासिक वास्तू व गौरवशाली परंपरा यांचे वैशिष्ट्यपूर्ण व अनोखे सादरीकरण, भारतीय संस्कृतीविषयी विशेष व विविध परंपरा व रितीरिवाज दाखवणारी चित्रे, भावपूर्ण व्यक्तिचित्रे वगैरे साकारणारी बहुआयामी भावपूर्ण चित्रे आणि कांस्य आणि मिश्र माध्यमातील शिल्पे वगैरे ठेवण्यात आली आहेत. त्यातून सहभागी होणाऱ्या चित्रकारांच्या अभूतपूर्व शैलीचे व माध्यमावरील प्रभुत्वाचे सर्वांना योग्य दर्शन होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in