काळाघोडा उत्सवात हस्तनिर्मित कापड कलाकृतींचे प्रदर्शन

भारतीय राज्यघटनेच्या ७५व्या वर्षाच्या निमित्ताने देशभरातील कारागीर गटांनी तयार केलेल्या ७५ वेगवेगळ्या हस्तनिर्मित कापड कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले
काळाघोडा उत्सवात हस्तनिर्मित कापड कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबई : हमारी विरासत (आमचा वारसा), हँड फॉर हँडमेड फाऊंडेशनचा एक उपक्रम कारागीर क्षेत्राच्या समृद्धीचा उत्सव आहे. भारतीय राज्यघटनेच्या ७५व्या वर्षाच्या निमित्ताने देशभरातील कारागीर गटांनी तयार केलेल्या ७५ वेगवेगळ्या हस्तनिर्मित कापड कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे नेत्रदीपक भित्तिचित्र ७५ वेगवेगळ्या कलाकृतींचे प्रदर्शन आहे. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल आणि हँड फॉर हँडमेड फाऊंडेशनच्या संस्थापक शिबानी दासगुप्ता जैन यांच्या हस्ते या भित्तीचित्राचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे जेएसडब्ल्यू समूहाद्वारे आयोजित प्रदर्शन २० ते २८ जानेवारी दरम्यान काळाघोडा उत्सवादरम्यान प्रदर्शित केले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in