मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे शेड्स ऑफ पॅशन’चा सामूहिक कलाविष्कार

विविध माध्यम आणि तंत्रशैली वापरून साकारलेली संकल्पनात्मक चित्रे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत
मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे शेड्स ऑफ पॅशन’चा सामूहिक कलाविष्कार

रोमार्टिका आर्ट डिकोडेड ह्या कलाप्रवर्तक संस्थेतर्फे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे ९ ते १५ ऑगस्ट रोजी सामूहिक चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना हे प्रदर्शन विनामूल्य बघता येणार असून प्रदर्शनात २८ गुणवान व होतकरू कलाकारांची चित्रे व शिल्पकृती ठेवण्यात येणार आहेत. विविध माध्यम आणि तंत्रशैली वापरून साकारलेली संकल्पनात्मक चित्रे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

होतकरू व गुणवान चित्रकारांना व शिल्पकारांना संधी देऊन व योग्य तऱ्हेने प्रोत्साहन देऊन त्यांची कलारूपे रसिकांसमोर आंत एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा रोमार्टिका आर्ट डिकोडेड ह्या कालसंस्थेचा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत होतकरू कलाकारांच्या सामूहिक चित्रांचे प्रदर्शन ९ ऑगस्टपासून आयोजित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in