बनावट पासपोर्टवर विदेशवारी महागात

पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते
बनावट  पासपोर्टवर विदेशवारी महागात

मुंबई : अमेरिकेत कायमचे स्थायिक होण्यासाठी एका एजंटच्या मदतीने व्यक्तीच्या पासपोर्टवर विदेशात जाणे एका प्रवाशाला चांगले महागात पडले. बोगस पासपोर्टवर गेलेल्या या प्रवाशाला कझाकिस्तानहून बँकॉंकमार्गे मुंबईत पाठविण्यात आले. मुंबईत आल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. आकाशदिपसिंग जितेंद्रसिंग मान असे या प्रवाशाचे नाव असून, तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोमवारी रात्री सव्वादहा वाजता आकाशदिपसिंग मान कझाकिस्तानहून बँकॉंकमार्गे मुंबईत आला होता. त्याला तेथील परत पाठविण्यात आले होते. चौकशीदरम्यान तो राजस्थानचा रहिवाशी असून, व्यवसायाने शेतकरी आहे. त्याला अमेरिकेत कायमचे स्थायिक व्हायचे होते. त्यासाठी त्याने एका एजंटला ४० लाख रुपये दिले होते. या एजंटने त्याला मानदिप सिंग या नावाने पासपोर्ट आणि विमान तिकिट दिले होते. याच पासपोर्टवर तो २२ जुलैला दिल्लीहून बँकॉंक आणि नंतर कझाकिस्तानात गेला होता. त्याच्या पासपोर्टची पाहणी केल्यानंतर त्याच्या पासपोर्टचा फोटो आणि त्याचा चेहरा यांच्यात प्रचंड तफावत आढळून आले. त्यामुळे त्याला कझाकिस्तान इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्याला पुन्हा बँकॉंक येथे पाठविण्यात आले. बँकॉंक विमानतळावर तेथील इमिग्रेशन अधिकार्‍यांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला. त्याला भारतीय दूतावास कार्यालयातून इमर्जन्सी सर्टिफिकेट मिळवून देऊन पुन्हा मुंबईत पाठविण्यात आले होते. त्याने मानदिप सिंग या व्यक्तीच्या नावाने मिळालेल्या पासपोर्टवर विदेशात जाऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in