परशुराम उपरकर यांची ‘मनसे’तून हकालपट्टी

मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती
परशुराम उपरकर यांची ‘मनसे’तून हकालपट्टी

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज होते. अखेर मनसेने परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज यांची पक्षातून हकालपट्टी केली. मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्र काढून सांगितले की, राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर, प्रवीण मर्गज यांचा यापुढे मनसेसोबत कोणताही संबंध असणार नाही, संबंधितांनी याची नोंद घ्यावी. निवडणुकीच्या काळात मनसे संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत. परशुराम उपरकर हे मनसेचे सरचिटणीस होते. मात्र राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर उपरकर हे नाराज होते. गेल्या वर्षभरापासून परशुराम उपरकरांनी पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा व्यासपीठावर गेले नाहीत. बैठकांना हजर राहिले नाहीत. माजी आमदार म्हणून ते मतदारसंघात कार्यरत राहिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in