पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; १९ जूनपर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी, २६ जूनला पहिली गुणवत्ता यादी

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; १९ जूनपर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी, २६ जूनला पहिली गुणवत्ता यादी
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना बुधवार १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करता येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठामार्फत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. https://muadmission. samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करणे अनिवार्य असून विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या महाविद्यालयांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरणे देखील अनिवार्य आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार२२ मे ते १५ जून या कालावधीत ऑनलाईन नाव नोंदणी ते अर्ज सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता; मात्र एखाद्या विद्यार्थ्यांस काही अपरिहार्य कारणास्तव नोंदणी ते अर्ज सादर करण्यास उशीर झाला असल्यास त्यांना संधी मिळावी या उद्देश्याने ही मुदतवाढ दिली जात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार व वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी संबंधित महाविद्यालयामार्फत व विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in