पीएचडी प्रवेश परीक्षेसाठीच्या (पेट) ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ

या ऑनलाईन नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ३ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत
 पीएचडी प्रवेश परीक्षेसाठीच्या (पेट) ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ
Published on

मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी (पेट) ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ ऑगस्टपर्यंत या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.

२९ जुलैपासून सुरु करण्यात आलेल्या या ऑनलाईन नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ३ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक १४९८, मानव्य विद्या शाखेसाठी ८७०, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेसाठी ५४४ तर आंतर विद्याशाखेसाठी ४७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ३९९ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. चारही विद्या शाखेतील एकूण ७९ विषयांसाठीची ही परीक्षा ऑगस्ट २०२२ पर्यंत घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन असून यासंदर्भात लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in