डेटिंग अ‍ॅपवर महिलेशी ओळख, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉल अन् तरुणाने गमावले 3.5 लाख रुपये

अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ३१ वर्षांच्या एका तरुणाकडून साडेतीन लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी हर्षिता जैन या महिलेविरुद्ध ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
डेटिंग अ‍ॅपवर महिलेशी ओळख, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉल अन् तरुणाने गमावले 3.5 लाख रुपये

मुंबई : अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ३१ वर्षांच्या एका तरुणाकडून साडेतीन लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी हर्षिता जैन या महिलेविरुद्ध ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तिच्या सांगण्यावरून तक्रारदार तरुणाने अकरा विविध बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली असून या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताडदेव येथे राहणारा तक्रारदार तरुण एका खासगी कंपनीत कामाला आहे. तीन दिवसांपूर्वी मोबाईलवर डेटिंग ॲपवर सर्च करताना त्याने स्वत:ची वैयक्तिक माहिती अपलोड केली होती. या ॲॅपच्या माध्यमातून त्याला हर्षिता जैन या तरुणीचा मोबाईल क्रमांक सापडला होता. त्यामुळे त्याने तिला कॉल केला होता. त्यांच्यात संभाषण सुरू झाले होते. दुसऱ्या दिवशी हर्षिताने त्याला व्हिडीओ कॉल केला होता. हा फोन घेतल्यानंतर त्याला समोर एक तरुणी नग्नावस्थेत अश्‍लील चाळे करताना दिसली. त्यामुळे त्याने कॉल बंद करून तिचा कॉल ब्लॉक केला होता. काही वेळाने हर्षिताने दुसऱ्या मोबाईलवरून फोन करून त्याचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. बदनामीच्या भीतीने त्याने तिला वेगवेगळ्या अकरा बँक खात्यात ३ लाख ६० हजार रुपये पाठवून दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in