कस्टमचे जप्त सोने देण्याची बतावणी करून दहा कोटींचा गंडा

कस्टम विभागाकडून विविध कारवाईत जप्त केलेले सोने लिलावात काढत असून ते सोने त्यांना स्वस्तात देण्याचे आमिष कवितासह स्वातीने दाखविले होते.
कस्टमचे जप्त सोने देण्याची बतावणी करून दहा कोटींचा गंडा

मुंबई : कस्टमने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेची सुमारे दहा कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या मुख्य आरोपी महिलेस पुण्यातून डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. श्‍वेता अनिल बडगुजर ऊर्फ कविता दिपक देसाई ऊर्फ स्मिता दिपक देसाई असे या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी याच गुन्ह्यांत तिचा मुलगा अक्षय दिपक देसाई याला पोलिसांनी अटक केली होती. अक्षयच्या अटकेनंतर ती पळून गेली होती. अखेर तिला तिला तीन महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंधेरी येथे नूतन प्रसाद आयरे ही व्यावसायिक महिला राहत असून, तिचा कापार्रेट गिफ्टींगचा व्यवसाय आहे. स्वाती जावकर ही तिची मैत्रिण असून, तिने तिची ओळख श्‍वेता ऊर्फ कविताशी करुन दिली होती. ती सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकिल असून, तिचा भाऊ पियुष प्रधान आणि मैत्रिण माधवी हे दोघेही कस्टममध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले होते.

कस्टम विभागाकडून विविध कारवाईत जप्त केलेले सोने लिलावात काढत असून ते सोने त्यांना स्वस्तात देण्याचे आमिष कवितासह स्वातीने दाखविले होते. या आमिषाला बळी पडून नूतर आयरेसह तिच्या सहा परिचितासह नातेवाईकांनी सोन्यासाठी तिच्यासह तिचे दोन मुले दर्शन, अक्षय आणि स्वातीला सुमारे दहा कोटी रुपये दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in