वर्षभरात तब्बल १७,८३६ एसटी कर्मचाऱ्यांची नेत्र, आरोग्य तपासणी

राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात एसटी बसेसचे अपघात होत आहेत.
वर्षभरात तब्बल १७,८३६ एसटी कर्मचाऱ्यांची नेत्र, आरोग्य तपासणी

कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांची अविरत सेवा सुरू होती; मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंध आल्याने एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांची आरोग्य आणि नेत्रतपासणी करण्यात आली नाही. यांनतर कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मागील वर्षभरात प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्यातील विविध आगारात आरोग्य तपासणी तसेच नेत्रतपासणी करण्याचा सपाटा लावला. वर्षभरात तब्बल १७,८३६ एसटी कर्मचाऱ्यांची नेत्र, आरोग्य तपासणी केली असून, यामध्ये १० हजार एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, तर सात हजार ८३६ कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात एसटी बसेसचे अपघात होत आहेत. यापैकी तीन चालकांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना घडल्या आहेत. या कालावधीत एसटी कर्मचारी संघटना तसेच इतर संघटनांकडून एसटीच्या चालक व वाहकांची वयोमानानुसार केवळ नेत्रतपासणी केली जाते; मात्र आरोग्य तपासणीसाठी एसटी प्रशासन टाळाटाळ करत असल्याची टीका करण्यात येत आहे. याबाबत एसटी महामंडळाला विचारले असता प्रतिवर्षी राज्यातील सर्व आगारात कर्मचाऱ्यांची नेत्रतपासणी, आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in