ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत व्यवसायांना प्रोत्साहन; २४ विभाग कार्यालयांत परवाने वितरण प्रक्रिया सुलभ

व्यवसाय सुलभता म्हणजेच ईज ऑफ डुईंग बिझनेस, त्याअंतर्गत विभाग स्तरावर दिले जाणारे सर्व परवाने सुलभीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत व्यवसायांना प्रोत्साहन; २४ विभाग कार्यालयांत परवाने वितरण प्रक्रिया सुलभ
Published on

मुंबई : ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत मुंबई महापालिका व्यवसायांना प्रोत्साहन देणार आहे. यामुळे पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांत परवाने देण्याच्या प्रक्रियेत सुलभता येईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया तातडीने केल्या जातील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

व्यवसाय सुलभता म्हणजेच ईज ऑफ डुईंग बिझनेस, त्याअंतर्गत विभाग स्तरावर दिले जाणारे सर्व परवाने सुलभीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 'अनुपालन सुलभता', 'देखरेख सुलभता' आणि 'सेवा वितरण सुलभता' हे गेल्या वर्षी मंजूर झाले आहेत. व्यवसाय सुलभतेसाठी अद्ययावत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. नागरिकांसाठी सर्वसमावेशक अशी नियमपुस्तिकाही तयार करण्यात येत आहे. व्यवसाय व नागरी सेवा वितरीत करण्यात या प्रणालीची परिणामकारकता लवकरच दृश्य स्वरूपात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in