सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगता येत नाही, पोटनिवडणूक माघारीबद्दल फडणवीसांचे वक्तव्य

पराभवाला घाबरून आम्ही माघार घेतली असे आता काही जण म्हणत आहेत. मुळात यात तथ्य नाही. आजच्या ग्रामपंचायत निवडणुकांनी अशांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर
सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगता येत नाही, पोटनिवडणूक माघारीबद्दल फडणवीसांचे वक्तव्य

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाचाच विजय होईल याची पूर्ण खात्री होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनंती केली की निवडणूक लढवू नका. या दोघांनी जाहीरपणे केली काहींनी मागून विनंती केली. त्यामुळे सगळयांशी चर्चा करून भाजपाने या निवडणुकीत माघारीचा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात आमच्याकडे बराच खल झाला. कार्यकर्त्यांचे तसेच मुंबई विभागाचेही मत होते की निवडणूक लढलीच पाहिजे. मुरजी पटेल तर अपक्ष होते तेव्हा देखील त्यांनी ४५ हजार मते घेतली होती. त्यामुळे विजयाची पूर्ण खात्री होतीच. मात्र राज ठाकरे, शरद पवार यांनी समोरून विनंती केली. काहींनी मागून विनंती केली. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर या आधी देखील आर.आर. पाटील, पतंगराव कदम यांच्या निधनानंतर देखील आम्ही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून आम्ही अंधेरीतही उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पराभवाला घाबरून आम्ही माघार घेतली असे आता काही जण म्हणत आहेत. मुळात यात तथ्य नाही. आजच्या ग्रामपंचायत निवडणुकांनी अशांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कोणासारखे हवेत दावे करत नाही. एकूण ११४१ ग्रामपंचायतींपैकी ८८९ ग्रामपंचायतींचे निकाल आमच्या हाती आले आहेत. त्यातील ३९७ ठिकाणी भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना ८१, उदधव ठाकरे शिवसेना ८७, काँग्रेस १०४, राष्ट्रवादी काँग्रेस ९८ आणि अपक्ष ९५ ठिकाणी यश मिळाले आहे. भाजपा पुन्हा एकदा नंबरवन वर आला आहे. महाविकास आघाडीच्या एकत्रित संख्येपेक्षा आमची संख्या जास्त आहे. आमचे कार्यकर्ते तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी बरीच मेहनत घेतली ते अभिनंदनास पात्र असल्याचेही फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in