बोगस आधारकार्ड बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

याप्रकरणी मोहम्मद मारुफ अब्दुल खान आणि मोहम्मद दानिश शहाआलम शेख दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
बोगस आधारकार्ड बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Published on

मुंबई : कांदिवलीतील एका बोगस आधारकार्ड बनविणाऱ्या टोळीचा चारकोप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद मारुफ अब्दुल खान आणि मोहम्मद दानिश शहाआलम शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या आधारकार्ड सेंटरचा मालक चालक शिव चंदुबा गुप्ता ऊर्फ शिवा असून, त्याचा शोध सुरू आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात पाचशे ते एक हजारामध्ये बोगस आधारकार्ड बनविले जात असल्याची माहिती चारकोप पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी शुक्रवारी चारकोप पोलिसांच्या एका विशेष पथकाने चारकोप, निळकंठ नगर, लकडावाला एसआरए इमारतीच्या रुम क्रमांक १०७ मध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे आधारकार्ड ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद मारुफ आणि हेल्पर मोहम्मद दानिश या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीत त्यांनी आतापर्यंत अनेकांना बोगस आधारकार्ड बनवून दिल्याची कबुली दिली. घटनास्थळाहून पोलिसांनी तीन मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर, कॅमेरा, मॉनिटर, स्कॅनर मशिन असा सुमारे ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in