२०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त; ३३ वर्षीय पेंटरला अटक

मालवणी पोलिसांनी एका ३३ वर्षीय पेंटरला बनावट नोटाप्रकरणी अटक केली असून कसून चौकशी करण्यात येत आहे
२०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त; ३३ वर्षीय पेंटरला अटक
@ANI

मुंबईमध्ये मालवणी पोलिसांकडून बनावट नोटांप्रकरणी कारवाई केली आहे. याप्रकरणी एका ३३ वर्षीय पेंटरला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल ६० हजार रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या जप्त केलेल्या नोटा तपासासाठी पुढे पाठवण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय पेंटर हनीफ शेख याच्याकडून २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, ६० हजार दर्शनी मूल्याच्या या नोटा पुढील तपासासाठी पाठवण्यात आल्या असून हनीफ शेखची कसून चौकशी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पवईमध्ये क्राईम ब्रांचने तब्बल ८० लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. क्राईम ब्रांचच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in