३० कोटींची बनावट इंक टोनर्स, कार्ट्रिजेस जप्त

३० कोटींची बनावट इंक टोनर्स, कार्ट्रिजेस जप्त

मुंबईतून १ लाखांहून अधिक अवैध उत्पादने ताब्यात घेण्यात आली. या उत्पादनांमध्ये अनेक बनावट टोनर आणि इंक कार्ट्रिजेसचा समावेश होता.

मुंबई : देशभरात नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात सुमारे ३० कोटी रुपये मूल्याची बनावट एचपी उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. एचपीच्या अँटि-काऊंटरफिटिंग अँड फ्रॉड (एसीएफ) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी मुंबईतून १ लाखांहून अधिक अवैध उत्पादने ताब्यात घेण्यात आली. या उत्पादनांमध्ये अनेक बनावट टोनर आणि इंक कार्ट्रिजेसचा समावेश होता. यापैकी बहुसंख्य कारवाया मुंबईत झाल्या आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबई भागात एचपी प्रिंटर्सची बनावट कार्ट्रिजेस उत्पादित करण्याची आणि ती ऑनलाईन विकण्याची एक योजना प्राधिकरणांनी उधळून लावली. या कारवाईत २५,००० अवैध उत्पादने जप्त करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in