
कमल मिश्रा / मुंबई
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अवघ्या ७२ तासांत एक गाजलेला आणि बनावट दरोड्याचा प्रकार उघडकीस आणत १.८२ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत करण्यात यश आले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला हा प्रकार मोठ्या दरोड्याप्रमाणे नोंदवण्यात आला होता, पण तपासात हा एक अत्यंत नियोजनबद्ध बनाव असल्याचे स्पष्ट झाले.
३० सप्टेंबर २०२५ रोजी ट्रेन क्रमांक १२१८७ - जबलपूर-CSMT गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये दरोड्याची घटना घडल्याची तक्रार सागर पारेख नावाच्या प्रवाशाने मुंबई येथील शासकीय रेल्वे पोलीस स्टेशनवर दिली होती. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ५२ सोन्याच्या बांगड्या आणि ३५ सोन्याच्या अंगठ्या असे एकूण १.५ किलो वजनाचे, १.८२ कोटी रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असल्याचे नमूद केले होते.