पालिकेत बायोमेट्रिक हजेरीत बोगसगिरी; माहिती अधिकारातून प्रकार उघडकीस

कधी या कधी जा कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिकेने बायोमेट्रिक हजेरी पद्धत अंमलात आणली. मात्र पालिकेच्या या कटकटीवर फर्मानावर तगडा उपया शोधत बोगस बायोमेट्रिक हजेरी लावत असल्याचा पर्दाफाश झाला आहे.
पालिकेत बायोमेट्रिक हजेरीत बोगसगिरी; माहिती अधिकारातून प्रकार उघडकीस
PM

मुंबई : कधी या कधी जा कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिकेने बायोमेट्रिक हजेरी पद्धत अंमलात आणली. मात्र पालिकेच्या या कटकटीवर फर्मानावर तगडा उपया शोधत बोगस बायोमेट्रिक हजेरी लावत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. पालिकेच्या परिरक्षण खात्याने माहिती अधिकारात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गलगली यांनी पालिका आयुक्त कार्यालयाकडे मागील पाच वर्षांत बनावट बायोमेट्रिक उपस्थितीबाबत माहिती विचारली होती. पालिकेच्या मुख्यालय परिरक्षण खात्याने गलगली यांस सफाई कामगार रमेश सोळंखी, ज्योती घुगल आणि सुहास कासारे यांची माहिती उपलब्ध करून दिली.

सुहास कासारे याने स्वतःच्या हजेरीबरोबर रमेश सोळंखी आणि ज्योती घुगल यांची हजेरी लावली. त्यावेळी रमेश सोळंखी आणि ज्योती घुगल हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बायोमेट्रिक यंत्राजवळ दिसून येत नव्हते. पालिकेने या तिघांना समज दिली, पण आजमितीला कोणतीही कारवाई केलेली नाही. अन्य कोणत्याही खात्याने अजून माहिती दिली नाही.

पालिका मुख्यालय असो की, अन्य पालिकेचे कार्यालय सर्वत्र असा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. नमूद प्रकरणात कोणतीच कारवाई न झाल्याने असे प्रकार भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बायोमेट्रिक हजेरी अत्याधुनिक यंत्रणा असली, तरी याचा दुरुपयोग होत आहे. बोगसगिरी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर आणि कडक कारवाई केल्यास भविष्यात अशी चूक कोणीही करणार नाही. तसेच जे अश्या प्रकरणात आढळून येतात त्यांच्यावर कारवाई करत त्याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी.

- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ता

logo
marathi.freepressjournal.in