
मुंबई विद्यापीठाच्या वतीने जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी ) आणि प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लीटरेचर (डीलिट ) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ही मानद पदवी बुधवार, ११ मे रोजी विशेष दीक्षांत समारंभामध्ये राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या फोर्ट येथे सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विशेष दीक्षांत समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.