वृक्षसंपदा, उद्यानातील वास्तूशास्त्र पद्धतीची भुरळ; पालिकेच्या उद्यानात इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांचा कल

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या २५ विद्यार्थ्यांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, राणीबाग येथे भेट दिली
वृक्षसंपदा, उद्यानातील वास्तूशास्त्र पद्धतीची भुरळ; पालिकेच्या उद्यानात इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांचा कल

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे मियावाकी वन साकारणे आदी उपक्रम पालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असतात. पालिकेच्या उद्यान विभागाची दखल घेत ‘जागतिक वृक्षनगरी’ असा बहुमान पटकावला आहे. उद्यान विभागामार्फत नवनवीन संकल्पना राबवण्यात येत असून वृक्षसंपदा उद्यानातील वास्तूशास्त्र पद्धतीची विद्यार्थ्यांना भुरळ पडली आहे. उद्यान विभागाच्या माध्यमातून नेकमे काय उपक्रम राबवण्यात येतात, याचा अभ्यास करण्यासाठी इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

बृहन्मुंबई मनपा उद्यान विभागामार्फत नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात. मियावाकी पद्धतीने कमी जागेत झाडांची लागवड करणे, गच्चीवरील उद्यान निर्मिती, भिंतीवरील बागा खुल्या जागेतील व्यायामशाळा, वृक्ष संजीवनी अभियान, वापरलेल्या प्लास्टिकपासून उद्यानातील बाकडे असे एक ना अनेक उपक्रम सीएसआरच्या माध्यमातून उद्यान विभागामार्फत सुरू असतात.

नुकतेच वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या २५ विद्यार्थ्यांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, राणीबाग येथे भेट दिली. यावेळी १६० वर्षाचा समृद्ध वारसा लाभलेल्या या उद्यानातील वास्तूशास्त्र विषयक रचना व कार्यपद्धती, उद्यानविषयक नवनवीन संकल्पना, वृक्षसंपदा, व इतर उद्यानविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in