घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने ६ जणांना चिरडले; महिलेचा मृत्यू

घाटकोपर पश्चिम येथील चिराग नगर मार्केटजवळ शुक्रवारी सायंकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने ३ गाड्यांना धडक देऊन ६ जणांना चिरडले.
घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने ६ जणांना चिरडले;  महिलेचा मृत्यू
Published on

मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील चिराग नगर मार्केटजवळ शुक्रवारी सायंकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने ३ गाड्यांना धडक देऊन ६ जणांना चिरडले. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून ‘हिट अँड रन’च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घाटकोपर पूर्व येथील चिराग नगर मार्केटजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन ते तीन दुचाकी वाहनांना धडक दिली. या घटनेत ६ जण जखमी झाले. या अपघातात प्रीती पटेल (३०) या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत असल्याचे चिराग नगर पोलिसांनी सांगितले.

जखमींची नावे

अरबाज शेख (२३), तुफा शेख (३८), मरुफा (२२), रेश्मा शेख (३०) व मोहरम शेख.

logo
marathi.freepressjournal.in