हर्नियाचे प्राणघातक परिणाम, योग्य उपचारासाठी शस्त्रक्रिया आवश्यक

पुरुषांप्रमाणेच हा आजार महिला किंवा मुलांनाही होऊ शकतो.
 हर्नियाचे प्राणघातक परिणाम, योग्य उपचारासाठी शस्त्रक्रिया आवश्यक

हर्निया आजार सध्या सर्व वयोगटातील नागरिकांसाठी प्राणघातक ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे हर्निया होण्याची सर्वाधिक शक्यता असते. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे शरीरातील किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय बाहेर येतो. हा कमजोर भाग जन्मतः उपस्थित असू शकतो किंवा पोटाच्या ऑपरेशननंतर निर्माण होऊ शकतो. पुरुषांप्रमाणेच हा आजार महिला किंवा मुलांनाही होऊ शकतो.

हर्निया बऱ्याच प्रकारचे असतात. हा आजार काही स्वतः होऊन बरा होत नाही. हर्निया प्रकारात अचूक ठिकाण ओळखण्यासाठी व योग्य उपचारासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. योग्य वेळी उपचार न केल्यास, हर्निया मोठा होऊ शकतो. यामुळे गंभीर आरोग्य समस्या येऊ शकतात. शस्त्रक्रिया ही एकमेव पर्याय आहे ज्यामुळे हर्नियाचा यशस्वीपणे उपचार केला जाऊ शकतो. हर्नियाच्या व्यक्स्थापनासाठी अनेक तंत्रे आहेत; सर्वात सामान्य पद्धत म्हणजे ओपन सर्जरी असून वुंड अँड व्हेन या क्लिनिकमध्ये हर्निया वरील आजारातील सर्वात आधुनिक उपचार पद्धती लॅप्रोस्कोपी आणि टीएआर पद्धतिचा वापर करण्यात येतो.

डॉक्टर कोणत्याही तपासणीशिवाय रुग्णाची केवळ हाताने तपासणी करुंन हर्नियाचे निदान करू शकतात. तथापि काही रुग्णांना निदानासाठी सीईसीटी किंवा डायनॅमिक एमआरआय स्कॅनची आवश्यकता असू शकते. हर्नियासंबंधी अधिक माहितीसाठी वुंड अँड व्हेन ऍडव्हान्स्ड क्लिनिक, अस्मी ड्रीम्स, पहिला मजला, गोरेगाव प. येथे भेट द्याव अथवा ७७७७०९०८५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हर्नियाचे विविध प्रकार

इंग्वायनल हर्निया : जांघेच्या मध्यभागी सूज येते, उभे असताना वेदना होणे अस्वस्थ वाटते.

इन्सिजनल हर्निया : पोटावरील शस्त्रक्रियेतील टाके कालांतराने विलग झाल्यास हा हर्निया निर्माण होतो.

हायटस हर्निया : खाली वाकल्यास छातीत जळजळ होणे. छातीत दुखणे, व गिळण्यास त्रास होणे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in