Mumbai : लैंगिक शोषण आरोपातून पित्याची मुक्तता

पोक्सो कायद्यांतर्गत दाखल केलेला गुन्हा वाजवी संशयापलीकडे अर्थात ठोसपणे सिद्ध झाला पाहिजे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी पित्याचे अपील मान्य करीत त्याची निर्दोष मुक्तता केली.
Mumbai High Court
Mumbai High Court
Published on

मुंबई : स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली दोषी आढळलेल्या पित्याला उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. पोक्सो कायद्यांतर्गत दाखल केलेला गुन्हा वाजवी संशयापलीकडे अर्थात ठोसपणे सिद्ध झाला पाहिजे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी पित्याचे अपील मान्य करीत त्याची निर्दोष मुक्तता केली.

वांद्रे पश्चिमेकडील रहिवाशी असलेल्या आरोपीने विशेष पोक्सो न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने निर्णय दिला. पीडित ११ वर्षांच्या मुलीचे आरोपी पित्याचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले होते.

logo
marathi.freepressjournal.in