पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक

अल्पवयीन मुलगी १३ वर्षांची आहे. तिचे वडील तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होते
पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक

मुंबई : आपल्या अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार करणाऱ्या नराधम पित्यास पोलिसांनी अटक केली आहे. या मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघड झाली.

ही अल्पवयीन मुलगी १३ वर्षांची आहे. तिचे वडील तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होते. याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली होती. दोन वर्षे तिने ही बाब लपवून ठेवली. मात्र, शनिवारी तिला रडताना तिच्या आईने पाहिले. आईने विश्वासात घेऊन तिला काय झाल्याचे विचारले. तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनांची माहिती दिली. आई व पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला घटनाक्रम सांगितला.

पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा कबुलीजबाब व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. हे रेकॉर्ड आरोपपत्रात पुरावा म्हणून घेतले जाईल. आरोपीचा गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याने केवळ हा गुन्हा घरात केलेला नाही, तर अनेक ठिकाणी केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीला रविवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, पोस्को अंतर्गत विविध गुन्हे दाखल केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in