Mumbai : दागिने चोरीप्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक

१३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे १३ किलो सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी गुजरातमधील जुनागढ येथून पिता-पुत्रासह तिघांना अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी येथे सांगितले.
Mumbai : दागिने चोरीप्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक
Published on

मुंबई : १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे १३ किलो सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी गुजरातमधील जुनागढ येथून पिता-पुत्रासह तिघांना अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी येथे सांगितले.

नाथाभाई हरदासभाई कुचडिया (५०), त्यांचा मुलगा जिग्नेश कुचडिया (१९) आणि यश जीवाभाई ओडेदरा (२१) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. जिग्नेश कुचडिया गुजरातमधील जे पी एक्सपोर्ट गोल्ड अँड डायमंड ज्वेलरीमध्ये काम करत होता, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तो व कंपनीचा आणखी एक कर्मचारी अजय सुरेशभाई घागडा यांच्यासोबत सोने विकण्यासाठी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकला भेट देऊन तीन दिवसांपूर्वी मुंबईत आला आणि शहरातील बोरिवली भागातील कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहिला, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

घागडाने जिग्नेश याला दागिन्यांची एक बॅग दिली होती. ती घेऊन त्याने पळ काढला होता. जिग्नेश फ्लॅटमधून गायब झाल्याचे घागडाला कळल्यानंतर तेव्हा त्याने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या एका विशेष पथकाला जिग्नेश हा कारमधून गुजरातला पळून जात असल्याचे आढळले. पोलिस पथकाने त्याला आणि इतर दोघांना जुनागढमध्ये पकडले. त्यांच्याकडून ११ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in