वांद्रे येथे पिता-पुत्रावर हल्ला ; आरोपीस अटक

जखमी झालेल्या या पिता-पुत्राला नंतर भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
वांद्रे येथे पिता-पुत्रावर हल्ला ; आरोपीस अटक

मुंबई : वांद्रे येथे एका पिता-पुत्रावर त्यांच्याच परिचित दोन बंधूंनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अश्रफ मेहमूद शेख या ६० वर्षांच्या वयोवृद्धासह त्याचा मुलगा आसिफ अश्रफ शेख (३८) जखमी झाले असून, त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रफिक कुरेशी आणि आतिक कुरेशी या दोन बंधूंविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी विविध भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून रफिकला अटक केली तर पळून गेलेल्या आतिकचा शोध सुरू केला आहे.

अश्रफ शेख हे वृद्ध वांद्रे येथील गरीबनगर परिसरात राहत असून, याच परिसरात रफिक आणि आतिक हे बंधू राहतात. ते दोघेही मद्यप्राशन करून त्यांना सतत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होते. शुक्रवारी रात्री रफिक हा आतिकसोबत तिथे आला आणि त्याने अश्रफ यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. हल्ल्यात जखमी झालेल्या या पिता-पुत्राला नंतर भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in