दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीए अलर्ट;मस्जिद बंदर येथून तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीए अलर्ट;मस्जिद बंदर येथून तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त
Published on

दिवाळी सणात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर आहे. मस्जिद बंदर चिंचबंदर येथील दुकानात ४०० किलो २ लाख ९९ हजार ९० रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त केले आहे, तर तीन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मुंबईचे सहआयुक्त शशिकांत केंकरे यांनी सांगितले.

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे मस्जिद बंदरमधील ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन, पहिला मजला, १५, श्रीनाथजी बिल्डिंग, केशवजी नाईकरोड, चिंचबंदर येथील ३ तुपाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ४०० किलो २ लाख ९९ हजार ९० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवालानंतर पुढील आवश्यक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in