कमी दर्जाच्या खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यांवर एफडीएकडून कारवाई होणार

दैनंदिन जीवनात विविध अन्न पदार्थ बनवण्यासाठी खाद्यतेलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
कमी दर्जाच्या खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यांवर  एफडीएकडून कारवाई होणार
Published on

सणासुदीचे दिवस जवळ आले असून, भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक शोधमोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातून खाद्यतेलाचे २७० नमुने गोळा केले असून कमी दर्जाच्या खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. दरम्यान, नमुने अन्न प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

दैनंदिन जीवनात विविध अन्न पदार्थ बनवण्यासाठी खाद्यतेलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सर्व नागरिकांना चांगल्या प्रतीचे खाद्यतेल मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विशेष मोहिमांमधून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील खाद्यतेल सर्वेक्षण मोहिमेमध्ये एकूण २७० नमुने घेण्यात आले, त्यापैकी खाद्यतेलाचे नमुने २५० वनस्पतीचे ०९ आणि मल्टी सोर्स एडीबल ऑईलचे ११ नमुने घेण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in