बाईकच्या धडकेत महिला पोलीस उपनिरीक्षक जखमी

या अपघातात पूजा या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले
बाईकच्या धडकेत महिला पोलीस उपनिरीक्षक जखमी
Published on

मुंबई : बाईक धडकेने मुलुंड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा धाकतोंडे या जखमी झाल्या. त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी अरविंद जीतलाल यादव या बाईकस्वाराला मुलुंड पोलिसांनी अटक केली. प्रकाश बाबूराव कोलेकर आणि उपनिरीक्षक पूजा धाकतोंडे हे मंगळवारी रात्री निर्भया पथकावर कर्तव्य बजावत होते. बुधवारी पहाटे पाच वाजता त्या पोलीस ठाण्यातून बाहेर येत होत्या. यावेळी ट्रिपल सीट बाईकवरुन जाणाऱ्या अरविंदने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात पूजा या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी प्रकाश कोलेकर यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी अरविंद यादवविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून महिला उपनिरीक्षक पूजा धाकतोंडे यांना दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in