फिरते विसर्जन तलाव आणि निर्माल्यापासून खत निर्मिती करणार

लाडक्या बाप्पाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा लागला
फिरते विसर्जन तलाव आणि निर्माल्यापासून खत निर्मिती करणार

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार असला तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळ व भक्तांना केले आहे. तसेच विसर्जन स्थळी जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी फिरते तलाव ठेवण्यात येणार असून यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी नसली तरी शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

लाडक्या बाप्पाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा लागला. मात्र यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून मुंबईत गणेशोत्सवाची आनंद वेगळाच असतो. मुंबईत गणपती विसर्जनासाठी एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. पालिकेच्या माध्यमातून सुमारे २४ विभागांत सुमारे १०० कृत्रिम तलावही तयार करण्यात येणार आहेत. शिवाय विभाग स्थरावर फिरती विसर्जन स्थळे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच विसर्जनाबाबत कोणतीही समस्या असल्यास संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रत्येक मंडळाने गणेशोत्सवाच्या कालावधीत तयार होणारे निर्माल्य व तत्सम पदार्थ साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in