मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आज(२२ सप्टेंबर) दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण आहे की, दुरुनच धुराचे लोट दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आग नेमकं कोणत्या कारणाने गागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
मॉलला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्याच बरोबर मुंबई पोलीस आणि रुग्मवाहिका देखील घटनास्थळी पोहचली आहे. या मॉलमधून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडत असून मॉलमध्ये कोणी अटकलं आहे का? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.