तीन गुन्ह्यांत साडेपंधरा लाखांची ऑनलाइन फसवणूक

सायबर ठगांचा शोध सुरू केला आहे
तीन गुन्ह्यांत साडेपंधरा लाखांची ऑनलाइन फसवणूक
Published on

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगांनी एका वयोवृद्धासह दोन महिलांची सुमारे साडेपंधरा लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साकीनाका, मालाड आणि एमआयडी पोलिसांनी तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नेांदविला आहे. साकीनाका येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेला नोकरीचे आमीष दाखवून विविध टास्क देण्यात आले होते. या टास्कद्वारे कमिशन मिळाल्याचे खात्री पटल्यावर या तरुणीने साडेपाच लाखांची गुंतवणूक केली होती.

दुसऱ्या घटनेत इलेक्ट्रिक बिल अपडेट करण्याची बतावणी करून अंधेरीतील रमेश लछवानी या ७८ वर्षांच्या वयोवृद्धाची ७ लाख ३८ हजारांची फसवणूक झाली. तिसऱ्या घटनेत एका महिलेस नटराज पेन्सिल कंपनीत पेन्सिल पॅकिंगचे घरबसल्या काम देण्याचे आमिष दाखवून सहा जणांच्या एका टोळीने अडीच लाखांची फसवणूक केली. या तिन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून या सायबर ठगांचा शोध सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in