सिनेदिग्दर्शकाच्या पत्नीने केली सव्वासात लाखांची चोरी ;पत्नीसह सासरा आणि सासूविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांनी या तिघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांत चोरीची तक्रार केली आहे.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : कौटुंबिक वादानंतर सिनेदिग्दर्शकाच्या पत्नीनेच घरातील सुमारे सव्वासात लाखांचा मुद्देमाल चोरी करून पलायन केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पत्नी सनम फारुख कबीर, सावत्र सासरे तेजस खन्ना आणि सासू दिलफुजा यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

अंधेरी येथे राहणारे फारुख कबीर हे सिनेदिग्दर्शक असून, त्यांनी खुदा हाफिज, खुदा हाफिज पार्ट दोन, अल्लाह के बंदे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी उझबेकिस्तानची नागरिक असलेल्या सनम या महिलेशी दिल्लीत विवाह केला होता. तेव्हापासून सनम ही तिचे सावत्र पिता तेजस खन्ना आणि आई दिलफुजासोबत त्यांच्या अंधेरीतील फ्लॅटमध्ये राहत होते; मात्र मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. त्यांना तिला उझबेकिस्तानचे नागरिकत्व द्यायचे होते, तर फकीर यांचा त्यास विरोध होता. त्यातून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. याच वादातून तेजसने त्यांना त्याचे अंडरवर्ल्डसह काही राजकीय नेत्यांशी ओळख असल्याची धमकी दिली. 

काही दिवसांनी त्यांना कॅनडा, पंजाब, दुबईतील माफियांकडून जिवे मारण्याची धमकी येऊ लागल्या. २१ डिसेंबरला सनम, तेजस आणि दिलफुजा हे त्यांच्या घरातून मुलीला घेऊन कोणालाही काहीही न सांगता पळून गेले होते. यावेळी त्यांनी कपाटातील विदेशी चलन, सोन्याचे दागिने, कॉईन, आयफोन, महागडे घड्याळ, चांदीचे दागिने, लग्नाच्या प्रमाणपत्रासह इतर महत्त्वाचे दस्तावेज असा सव्वासात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांनी या तिघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांत चोरीची तक्रार केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in