१०० वर्षे जुन्या इमारतीत विनापरवानगी चित्रपटाचे शूटींग;अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

फोर्ट परिसरात ए के नायक रोडवर द पारशी लाईन लाईंग इन ही १०० वर्षे जुनी हॉस्पिटलची इमारत आहे
१०० वर्षे जुन्या इमारतीत विनापरवानगी चित्रपटाचे शूटींग;अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबईत फोर्ट परिसरात द पारशी लाईन लाईंग इन हॉस्पिटल ही १०० वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीत पालिकेची परवानगी न घेता चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केली आहे.

फोर्ट परिसरात ए के नायक रोडवर द पारशी लाईन लाईंग इन ही १०० वर्षे जुनी हॉस्पिटलची इमारत आहे. या इमारतीमध्ये अनेक वेळा चित्रपटाच्या शूटिंग होतात. आताही एका चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. शूटिंगच्या वेळी बांधकामामध्ये करण्यात येणाऱ्या बदलामुळे इमारत कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडे तसेच पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. या इमारतीमध्ये विनापरवानगी शूटिंग सुरू असल्याने यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर करावी करावी, अशी मागणी संजय गुरव यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in