‘महारेरा’ कडून प्रकल्प श्रेणीचे निकष अंतिम

विविध प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता, कायदेशीर बाब आदींचा विचार केला जाईल
‘महारेरा’ कडून प्रकल्प श्रेणीचे निकष अंतिम

मुंबई : राज्यातील बांधकाम व्यवसायाला शिस्त लावण्याच्या हेतूने ‘महारेरा’कडून प्रकल्पांची श्रेणी निश्चिती करण्यात येणार आहे. या अंतर्गत प्रकल्प श्रेणीचे निकष अंतिम केले आहेत. हे निकष संपूर्ण राज्यासाठी लागू असतील.

‘महारेरा ग्रेडिंग मॅट्रिक्स’ असे त्याचे नामांतर केले आहे. बिल्डरनी ‘महारेरा’ला दिलेल्या माहितीच्या आधारे हे रेटिंग्ज दिले जातील. पहिल्यांदा प्रकल्पाला त्यानंतर प्रवर्तकांना रेटिंग दिले जाईल. त्याचबरोबर अनेक बाबींचा विचार केला जाणार आहे. प्रकल्पाची आर्थिक व्यवहारता, विविध प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता, कायदेशीर बाब आदींचा विचार केला जाईल.

प्रकल्पाचे मूल्यांकन दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रकल्पाची माहिती असेल. त्यात प्रकल्पाचा तपशील, स्थळ, विकासक, सुविधा यांचा समावेश असेल, तर तांत्रिक माहितीत कमेन्समेंट सर्टिफिकेट, तिमाही व वार्षिक कम्प्लायन्स रिपोर्ट, प्रकल्पाची स्थिती, आर्थिक बोजा, प्रकल्पाची वित्तीय प्रगती, वार्षिक लेखा प्रमाणपत्र, कज्जेदलाली आदींचा विचार केला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in