संघाच्या डीपीवर अखेर भगवा ध्वज हटवून ‘तिरंगा’ लावला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली असून, सर्वांनी आपल्या डीपीवर तिरंगा ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले होते
 संघाच्या डीपीवर अखेर भगवा ध्वज हटवून ‘तिरंगा’ लावला

सरकार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही शुक्रवारी आपल्या सर्वच सोशल मीडिया अकाउंट्सचे प्रोफाइल पिक्चर बदलून त्यावर तिरंगा ठेवला आहे. संघाने आपल्या डीपीवरून भगवा ध्वज हटवून ‘तिरंगा’ लावला आहे. संघाने प्रथमच असे केल्यामुळे या गोष्टीची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली असून, सर्वांनी आपल्या डीपीवर तिरंगा ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर विरोधकांनी सातत्याने संघाला लक्ष्य करीत ते भगवा हटवून तिरंगा फडकवणार का, असा टोला लगावला होता. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत व संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनीही अखेर आपल्या डीपीवर तिरंगा लावला आहे.

संघाच्या प्रचार विभागाचे सहप्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, संघ आपल्या सर्वच कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संघाने आपल्या ऑफिशियल हँडलवर तिरंगा न लावण्याच्या मुद्द्यावरून अलीकडेच विरोधकांनी त्यांच्यावर कठोर टीका केली होती. याप्रकरणी संघ व तिचे नेतृत्व केव्हा डीपीवर तिरंगा लावणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

संघ मुख्यालयावर ५२ वर्षांत फडकला नाही तिरंगा

संघाने ५२ वर्षांपर्यंत नागपुरातील आपल्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवला नाही. त्यामुळे आता तरी ते डीपीवर तिरंगा लावण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील काय, असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in