अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई लोकलने केला प्रवास; घाटकोपर ते कल्याण प्रवासाचे फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मुंबईची लाईफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून प्रवास केला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई लोकलने केला प्रवास; घाटकोपर ते कल्याण प्रवासाचे फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मुंबईची लाईफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून प्रवास केला. घाटकोपर ते कल्याण या लोकल प्रवासादरम्यान त्यांनी अन्य प्रवाशांशी संवाद साधला. कडेकोट बंदोबस्तात प्रवाशांनी अर्थमंत्र्यांसोबत फोटो-सेल्फी काढण्याचीही संधी साधली. या प्रवासादरम्यानचे फोटो सीतारामन यांच्या कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले आहेत.

X वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये निर्मला सीतारामन या दोन प्रवाशांशी सखोल संभाषण करताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासोबतच संबंधित विषयावर स्वतःचे इनपुट देखील अर्थमंत्र्यांनी शेअर केले. अजून एका व्हिडिओमध्ये त्या बाजूच्या लेडीज डब्यातील महिलांशीही संवाद साधताना दिसतात.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी निर्मला सीतारामन यांच्या लोकल ट्रेनमधील फोटोंवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी, सामान्य लोकांप्रमाणे प्रवास केल्याबद्दल आणि प्रवाशांशी संवाद साधल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे कौतुक केले आहे. तर, काहींनी त्यांना गर्दीच्या वेळेत अर्थात सकाळी आणि संध्याकाळी लोकलने प्रवास करून बघा, तेव्हाच सामान्यांच्या समस्या समजतील असेही सांगितले आहे. सीतारामन यांचे लोकल प्रवासाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in