४० हजार तृतीयपंथीयांना पालिकेचे आर्थिक बळ

स्वयंरोजगारासाठी ब्युटीपार्लर, स्क्रील डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग ; दोन कोटी ४० लाखांची तरतूद
४० हजार तृतीयपंथीयांना पालिकेचे आर्थिक बळ

मुंबई: तृतीय पथांना समाजात योग्य स्थान मिळावे, हक्काचा व्यवसाय करता यावा या उद्देशाने मुंबईतील तृतीय पथांना ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग, इडली डोसा बनवण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत ४० हजार तृतीय पथ असून त्यांना आत्मनिर्भर होऊन स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी मुंबई महापालिकेने तृतीयपंथीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जेष्ठ नागरिक, महिला बचत गट, लहान मुले, बेघर आदींसाठी मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. महिला बचतगटांना शिलाई मशीन, घरघटी, मसाला कांडप मशीन आदी साहित्य स्वयं रोजगारासाठी उपलब्ध करून देण्यात येत असतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी नियोजन विभागाच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आले आहेत. परंतु तृतीय पथांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रथमच तृतीय पंथांच्या संस्थांना संपर्क साधला. यात विक्रोळी येथील 'किन्नर मां एक' सामाजिक संस्थेने प्रतिसाद दिला आहे.

यापैकी ब्युटीपार्लर, कम्प्युटर, स्क्रील डेव्हलपमेंट आदींचे ट्रेनिंग देणे महापालिकेला शक्य होऊ शकते. तसेच पान टपरीचे साहित्य इडली डोसा बनवण्यासाठी मशीन उपलब्ध करण्यात काही अडचण नाही. यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, प्रस्तावात काही बदल सूचवल्यास ते करुन तृतीयपंथीयांना साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांना स्वावलंबी बनवण्यासह स्वयंरोजगाराची संधी मुंबई महापालिकेकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना हक्काचा व्यवसाय करता येईल आणि कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. पालिकेच्या या निर्णयामुळे तृतीयपंथी स्वतःचा व्यवसाय करतील आणि आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच मुंबई महापालिकेत कम्युनिटी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. सुशिक्षित तृतीयपंथींपैकी कोणाची तरी या पदावर नियुक्ती करण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.

- सोनाली चौकेकर, प्रोग्राम कोऑडिनेटर, किन्नर मां एक सामाजिक संस्था

विविध गोष्टी शिकण्यात रुची

'किन्नर मां एक' सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ४० हजार तृतीय पथ असून, त्यांना संगणक चालवणे, ब्युटीपार्लरचे ट्रेनिंग, स्क्रील डेव्हलपमेंट ट्रेनिंग, बिझनेस मॅनेजमेंट, ग्राफिक आर्ट अँड डिझाईन आदी गोष्टी शिकण्यात रुची दाखविली आहे. तसेच काही तृतीयपंथी पान टपरी चालवतात, इडली, डोसा विक्रीचे काम करतात, त्यामुळे पान टपरीचे साहित्य, इडली डोसा बनवण्यासाठी मशीन उपलब्ध केल्यास तृतीयपंथी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, असे किन्नर मां एक सामाजिक संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in