गोरेगाव येथील आस्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग

अग्निशमन दलाने १२.१२ वाजता आगीवर नियंत्रण मिळवल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
गोरेगाव येथील आस्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग

मुंबई : गोरेगाव पश्चिम मृणालताई गोरे पूल जवळील आस्मी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील चौथ्या मजल्यावरील ४२५ या बंद गाळ्यात शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत गाळ्यातील सामान जळून खाक झाले. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नसून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

गोरेगाव पश्चिम येथील मृणालताई गोरे पूल जवळील आस्मी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील चौथ्या मजल्यावरील ४२५ या बंद गाळ्यात शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. परंतु गाळ बंद असल्याने कोणी जखमी झाले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाने १२.१२ वाजता आगीवर नियंत्रण मिळवल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in