प्रभादेवी येथील बेस्टच्या सबस्टेशन केबिनला आग ; 5 दुचाकी जळून खाक

या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या आगीत दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक
प्रभादेवी येथील बेस्टच्या सबस्टेशन केबिनला आग ; 5 दुचाकी जळून खाक
Published on

मुंबईतील प्रभादेवी येथील बेस्टच्या सबस्टेशन केबिनला आग लागली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या आगीत दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक झाले. तर, या केबिनजवळील 5 दुचाकी आगीमुळे जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

आगीचे नेमके कारण तपासले जात आहे. या भागात उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे उपकेंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रभादेवी येथील उपकेंद्राला भीषण आग लागल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करणे हे मोठे आव्हान असेल. प्रभादेवी हा मोठ्या प्रमाणात निवासी परिसर आहे. सबस्टेशनला आग लागल्याने धुराचे लोट उठले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई शहर परिसरात बेस्टकडून वीजपुरवठा केला जातो. तर, काही ठिकाणी टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जातो. मुंबई उपनगरांना अदानी पॉवर आणि टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जातो.

logo
marathi.freepressjournal.in