कुर्ला बंटर भवन येथील येथे गॅलेक्सी इमारतीत आग

या दुर्घटनेत इमारत परिसरातील पाच ते सहा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.
कुर्ला बंटर भवन येथील येथे गॅलेक्सी इमारतीत आग

मुंबई : कुर्ला पूर्व येथील बंटर भवन या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे मीटर बॉक्सला आग लागली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून, पुढील तपास स्थानिक पोलीस व मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत. या दुर्घटनेत इमारत परिसरातील पाच ते सहा झोपड्या जळून खाक झाल्या. दरम्यान, दोन तासानंतर ७ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

कुर्ला पूर्व कुरेशी नगर, बंटर भवनच्या समोर असलेल्या गॅलक्सी इमारतीत शुक्रवारी पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाले. शॉर्ट सर्किटमुळे इमारतीतील मीटर बॉक्सने पेट घेतला. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, या आगीवर घटनेची स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in