वाळकेश्वर येथील हायराइज इमारतीला आग

आग कशामुळे लागली, याचा अधिक तपास संबंधित यंत्रणेकडून केला जात आहे
वाळकेश्वर येथील हायराइज इमारतीला आग
Published on

मुंबई : वाळकेश्वर येथील हायराइज सोहम अपार्टमेंट या २१ मजली इमारतीला गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

वाळकेश्वर रोड येथील सोहम अपार्टमेंट ही २१ मजली हायराइज इमारत आहे. सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सॅम्पल फ्लॅटमध्ये आग लागली. आग लागलेल्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग आदी साहित्य होते. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवण्यासाठी चारही बाजूने पाण्याचा फवारा व इतर साधनांचा वापर करून अवघ्या २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला. दरम्यान, आग कशामुळे लागली, याचा अधिक तपास संबंधित यंत्रणेकडून केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in